निवडणुकीसाठी माधुरी भोईर रिंगणात

 Kandivali
निवडणुकीसाठी माधुरी भोईर रिंगणात
निवडणुकीसाठी माधुरी भोईर रिंगणात
See all
Kandivali, Mumbai  -  

कांदिवली- कांदिवलीतील नगरसेवक योगेश भोईर यांनी आपल्या पत्नीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसच्या यांचा प्रभाव असलेल्या ठाकूर व्हिलेज, समतानगर, जानुपाडा भागात योगेश भोईर यांनी काँग्रेसतर्फेच निवडून येऊन स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.

योगेश भोईर यांना निवडून देणारे जीवलापाडा दत्ताजी नगर आणि लक्ष्मी नगर भाग मात्र वगळला गेल्याने भोईर यांच्या पत्नीला अधिक मेहनत घ्यावी लागेल असे दिसते. मुंबई लाईव्हशी बोलताना योगेश भोईर यांनी स्वतः केलेल्या कामामुळे मला लोक विसरणार नाहीत असे ठामपणे सांगितले. म्हणूनच माधुरी भोईर ह्या काँग्रेस पक्षातर्फे मनपा निवडणूक 2017 साठी योग्य दावेदार आहे, असेही ते म्हणाले. थोडक्यात योगेश भोईर यांचं वर्चस्व असलेल्या भागात सेना-भाजपच्या भक्कम दावेदारिच्या जोरावरच निवडणुकीत किती रंगत येईल ते ठरणार आहे.

Loading Comments