'भुजबळ विराट कोहली इतकेच फिट'

 Pali Hill
'भुजबळ विराट कोहली इतकेच फिट'
'भुजबळ विराट कोहली इतकेच फिट'
'भुजबळ विराट कोहली इतकेच फिट'
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र भुजबळांच्या मेडिकल रिपोर्ट पाहता, राजकारणी हे क्रिकेटपटू विराट कोहलीप्रमाणे फिट असतात, असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला. छगन भुजबळ यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र 22 ते 29 नोव्हेंबर या 8 दिवसांत तब्बल 26 जणांशी गाठीभेटी घेतल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईडीनं ही माहिती गुरूवारी कोर्टासमोर सादर केली. अंजली दमानिया म्हणाल्या, “भुजबळांचा आरोग्य अहवाल पाहता, राजकारणी हे विराट कोहलीप्रमाणे फिट असतात असं दिसून येतं. भुजबळांची तीन नोव्हेंबरला तपासणी झाली. थेलिअम स्कॅन चाचणीत त्यांचं LVEF चे 74% आढळलं. हे विराट कोहली इतकंच आहे. तरीही ते हॉस्पिटलमध्ये का? डॉक्टरांचं जे पथक भुजबळांवर उपचार करत आहे, ते बदलण्याची गरज आहे” भुजबळांच्या तपासण्या झाल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयातून जेलमध्ये पाठवायला हवं होतं. मात्र त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केलं. भुजबळ आतापर्यंत 41 दिवस जेलबाहेर आहेत. ते प्रकृतीच्या कारणास्तव तीनवेळा जेलबाहेर आले आहेत, असंही दमानियांनी नमूद केलं.

Loading Comments