एमएमआरडीए प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा धूमधडाका

 Pali Hill
एमएमआरडीए प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा धूमधडाका
एमएमआरडीए प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा धूमधडाका
एमएमआरडीए प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा धूमधडाका
See all

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा प्रकल्पाचं उद् घाटन आणि भूमिपूजन करत मुंबईकरांना आकर्षित करण्याचा धडाका भाजप-शिवसेनेनं सुरू केलाय. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकाधिक प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा घाट भाजप-शिवसेनेनं घातला आहे. त्यामुळे शिवस्मारक आणि मेट्रो प्रकल्पाबरोबरच आता शिवडी-न्हावा-शेवा सागरी मार्ग (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक), कलानगर जंक्शन उड्डाणपुल आणि कुर्ला-वाकोला उन्नत मार्गाचंही भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते उरकण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

शनिवारी, 24 डिसेंबरला 3 वाजता बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर या चारही प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. मेट्रो-2ब, मेट्रो-4 आणि मुंबई-नवी मुंबईला थेट जोडत मुंबई-नवी मुंबई अंतर कमी करणारा एमटीएचल प्रकल्प मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. तर कलानगर जंक्शन उड्डाणपुल आणि कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग हे बीकेसीतील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प आहेत. त्यामुळे अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करत मतदारांना आकर्षित करण्याचंच सरकारचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

Loading Comments