चेंबूरच्या प्रभाग 154मध्ये मोठी लढत

 Chembur
चेंबूरच्या प्रभाग 154मध्ये मोठी लढत

चेंबूर - पालिकेच्या एम पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 154 मध्ये सर्वच उमेदवार अनुभवी असल्याने याठिकाणी मोठी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून याच प्रभागातील नगरसेवक महादेव शिगवण हे आखाड्यात आहेत. तर सेनेकडून शाखा प्रमुख शेखर चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून माजी नगरसेवक किसन मेस्त्री यांचा मुलगा अभिषेक मेस्त्री रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीकडून विजय भोसले आणि मनसेकडून माउली थोरवे हे निवडणूक लढवत आहेत. पाचही उमेदवार या ठिकाणी अनुभवी असल्याने हा सामना चुरशीचा होणार असल्याचं चित्र सध्या प्रभागाच पहायला मिळत आहे.

Loading Comments