पालिकेच्या रणात ‘पाटलांच्या सूनबाई’

    मुंबई  -  

    दादर - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाचे रंगढंग नव्याने पहायला मिळणार आहेत. पालिकेच्या रणात शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आकड्यांचा खेळ रंगणार हे खरंच, पण या खेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांच्यापैकी एका किंवा तिन्ही पक्षांना ‘किंगमेकर’ बनण्याची संधी मिळू शकते. गेली अनेक वर्ष शेतकरी आणि श्रमजीवी समाजघटकाचं प्रतिनिधीत्व करणा-या आणि रायगडच्या राजकारणात मुरलेल्या शेकापच्या नेत्यांना मुंबईत आपलं बळ दाखवून देण्याची संधी साधायची आहे. शेकापच्या युवानेत्या आणि पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील शेकापचा युवा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.