Advertisement

देशपांडेंनी गड गमावला


देशपांडेंनी गड गमावला
SHARES

दादर - प्रभाग रचनेत झालेल्या बदलामुळे राजकारणातील अनेक दिग्गजांना याचा फटका बसला आहे. काही विभागामध्ये मागासवर्ग आणि महिला आरक्षणामुळे अनेकांना गड किल्ले, वॉर्ड गमवावे लागले आहेत. जी उत्तर विभागात वॉर्डची संख्या घटलेली किंवा वाढलेली नाही. पूर्वीच्या रचनेत या ठिकाणी 11 वार्ड होते, नव्या रचनेनुसार देखील या ठिकाणी 11 वॉर्ड राहिले आहेत. त्यामध्ये दादर विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदिप देशपांडे (वॉर्ड क्रमांक 185) आणि नगरसेवक सुधीर जाधव (वॉर्ड क्रमांक 184) यांना या विभाजनाचा चांगलाच फटका बसला आहे. आजूबाजूचे सर्वच वॉर्ड आरक्षित आणि मागासवर्गियांसाठी राखीव असल्यामुळे देशपांडे पुढील निवडणूक कुठून लढणार? असा सवाल विचारले असता. 'सर्व विभाजनावर राज ठाकरे जे निर्णय घेतील ते मान्य असेल'. 'पक्ष कार्यालयात यावर बैठक घेण्यात येईल'. तसेच 'राज ठाकरेंनी घेतलेले सर्व निर्णय मान्य असेल'. असे वक्तव्य देशपांडे यांनी केले.तर नगरसेवक सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधले असता त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे दादर विभागात असणा-या या दोन नगरसेवांकाचे पुढचे पाऊल काय असणार याबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता लागून राहिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा