मुस्लीम बँकिंग निर्णयाचं राजकारण ?

  मुंबई  -  

  मुंबई - मुस्लीम समाजाला आकर्षित करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणारी बँक सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारसमोर ठेवलाय. मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र खिडकी योजनाही प्रस्तावित आहे. हा निर्णय चांगला जरी असला तरी यामागे भाजपाचा राजकीय हेतूच आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांनी केलाय.

  आरबीआयनं अल्पसंख्यांक समाजासाठी घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्यामागचं उद्देश काय? असा प्रश्न राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी उपस्थित केलाय. मात्र विरोधी पक्षांचे हे आरोप भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी फेटाळून लावलेत. निर्णय मुस्लिम समाजाच्या फायद्याचा असला, तरी राजकीय पक्षांनी त्याला जोरदार विरोध केलाय. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापणार हे मात्र नक्की...

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.