पारदर्शकता म्हणजे काय रे, भाऊ ?

  मुंबई  -  

  अंधेरी - शिवसेनेसोबतची युती मोडण्यासाठी कळीचा मुद्दा ठरलेली पारदर्शकता आणि पार्टी विथ डिफरन्सची बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपाला अंधेरीतल्या त्यांच्या जनरल सेक्रेटरीनेच घरचा आहेर दिलाय. शिवसेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसचा हात सोडून कमळाशी जवळीक साधणाऱ्या मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीलाही वॉर्ड 76 तसेच वॉर्ड 81 मधून उमेदवारी दिली म्हणून इच्छुकांपैकी एक असलेल्या जगत गौतम यांनी नाराजी व्यक्त केलीय.

  निवडणूक आयोगाकडे तक्रार करणाऱ्या गौतम यांची नाराजी जरी तिकिटासाठीची असली तरी इतरही कार्यकर्त्यांनीही बोलून दाखवलेली भावना भाजपासाठी चांगली दिसत नाही. 20-25 वर्षे भाजपाला दिली. पण त्याचा फायदा दुसरेच उचलत आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. 

  स्वबळाची परीक्षा आता सर्वांनाच द्यावी लागणार असली तरी स्वतःचा महापौर बसवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबई भाजप अध्यक्षांची भूमिका आता काय असेल हे महत्त्वाचे आहे. अन्यथा, पारदर्शकता म्हणजे नक्की काय रं भाऊ, असं विचारत मुंबईकर जो काही कौल देतील, तो स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.