शिवसेना कार्यकर्त्यांनी पूजेचा मंडप तोडल्याचा भाजपाचा आरोप

 Mumbai
शिवसेना कार्यकर्त्यांनी पूजेचा मंडप तोडल्याचा भाजपाचा आरोप

मालाड - उत्तर भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज पोलीस स्टेशनसमोर आंदोलनाला बसले आहेत. शुक्रवारी उत्तर भारतीय संघाच्यावतीने सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आले होते. या पूजेला आमदार सुनील प्रभू यांनी विरोध केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. तसेच ही पूजा होऊ देणार नाही अशी धमकीही प्रभू यांनी दिल्याचं कंबोज म्हणालेत. दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी पूजेचा मंडप तोडल्याचा आरोपही कंबोज यांनी केला आहे. मात्र संतापलेल्या भाजपा आणि जय बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी देत शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Loading Comments