Advertisement

'तोडक कारवाईमागे भाजपाचा हात'


'तोडक कारवाईमागे भाजपाचा हात'
SHARES

सीएसटी - परवाना धारक स्टाॅलवर तोडक कारवाईचा विरोध असून या कारवाईमागे भाजपाचा हात असल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलाय. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

वांद्रे लिकिंग रोड या जागेवरील स्टॉलवर तोडक कारवाई करू नये असे अादेश न्यायालयाने दिल्यानतंरही पालिकेने या ठिकाणी तोडक कारवाई केली. त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याला कारणीभूत ठरणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी मेनन यांनी या वेळी केली.

पालिका कॅम्पाकोलासारख्या उच्चभ्रू इमारतींवर तोडक कारवाई करत नाही. त्यांचा सर्व राजकीय पक्षांना पुळका येतो. मात्र लिंकिंग रोडवर अनेक वर्षे व्यवसाय करणार्‍या परवाना धारक स्टाॅलवर तोडक कारवाई केल्यानंतर एकाही राजकीय पक्षाचा नेता पुढे अाला नसल्याचा आरोप मेनन यांनी केला.

भाजप मुंबई अध्यक्ष अाशिष शेलार यांना विधानसभा निवडणुकीमध्ये या विभागातील अल्पसंख्याक समाजाने मतदान न केल्याचा राग मनात धरून भाजपाने पालिकेच्या माध्यमातून ही तोडक कारवाई केल्याचं मेनन म्हणाल्या. या तोडक कारवाईविरोधात 8 फेब्रुवारी रोजी सांताक्रूझ पोलीस ठाणे ते पोलीस उपायुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. तसेच 13 फेब्रुवारीला 3 वाजता बडी मस्जिद येथे जमून मातोश्री बंगल्यावर अादीत्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही मेनन यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा