हुतात्म्यांना वंदन करून भाजपाच्या प्रचाराचा श्रीगणेशा


  • हुतात्म्यांना वंदन करून भाजपाच्या प्रचाराचा श्रीगणेशा
SHARE

नरिमन पॉईंट - हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत रविवारी भाजपाच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. या वेळी मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी आदी नेते उपस्थित होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत मुंबईतील 227 उमेदवारांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या प्रचारात आता भाजपानंही भावनिक राजकारणास सुरुवात केल्याचं यातून समोर येतंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या