कफ परेडमध्ये नोट पे वोट?

Mumbai  -  

कफ परेड - येथील 227 प्रभागातील भाजपाच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजपाचे कार्यकर्ते मतदारांच्या थेट घरी जाऊन त्यांची नावं आणि सह्या घेत आहेत.  यातल्याच एका महिला कार्यकर्तीच्या पर्समध्ये 2 हजार आणि 500 च्या नव्या करकरीत नोटा सापडल्या. या नोटा आपल्याच असल्याचा दावा संबंधित महिला कार्यकर्तीने केला आहे. या प्रभागात भाजपाचे उमेदवार मकरंद नार्वेकर विरूद्ध शिवसेनेचे अरविंद राणे असा सामना आहे. यासंदर्भात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आयोगाने अनोळखी व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments