भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

Mumbai  -  

सीएसटी - उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर देशभरात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईमधील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहित अन्य नेते जल्लोषात रंगून गेले होते. मुंबई लाइव्हला प्रतिक्रिया देताना आशिष शेलार यांनी सांगितले की, "भाजपाच्या विकासाच्या नाऱ्यावर विश्वास ठेऊन उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपाला साथ दिली आहे. विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखविली आहे. मायावतींचे वक्तव्य बालिशपणाचे आहे."

Loading Comments