सामना तीन दिवस बंद ठेवा - भाजपा

 Mumbai
सामना तीन दिवस बंद ठेवा - भाजपा
Mumbai  -  

मुंबई - शिवसेनेच्या सामना मुखपत्राविरोधात आता भाजापाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या 48 तास आधी वृत्तपत्रांमधून प्रचार, जाहिरात किंवा अन्य मार्गाने छापण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेत निवडणुका असल्याने 16, 20 आणि 21 तारखेला सामना छापण्यास बंदी घालावी, तसेच 15 फेब्रुवारीला सामना छापून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे शिवसेना, सामना संपादक आणि सामना वृत्तपत्रावर कारवाई करावी अशीही मागणीही त्यांनी यावेळी केली. सामानातील अग्रलेखाचा वापर शिवसेनेच्या प्रचारासाठी झाला आहे याची चौकशी करावी, तसेच जर प्रचारासाठी उपयोग होऊनही झालेला खर्च शिवसेनेने आपल्या प्रचारखर्चात जोडला नसेल तर पेड न्यूजमध्ये गृहीत धरा असंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Loading Comments