Advertisement

अनधिकृत वाचनालयामुळे रंगणार वाद


अनधिकृत वाचनालयामुळे रंगणार वाद
SHARES

भांडुप - कोकणनगर, खडीमशीन इथल्या रस्त्याच्या बाजूला वाचनालय उभारण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांनी घाट घातलाय. या वाचनालयाच्या इमारतीचं भुमीपूजन शुक्रवारी करण्यात आलं. रस्त्याच्या बाजूला उभारलं जाणारं हे वाचनालय मात्र अनधिकृत आहे.

कोकणनगर परिसरात खडी बनवण्याची मशीन याठिकाणी कार्यरत होती. त्यामुळे या भागाला खडीमशीन असं नाव पडलं. हा प्रकल्प बंद झाल्यानंतर पालिकेनं इथं रस्ता बांधला. रस्ता बांधल्यानं या जागेचे दोन भाग झाले. ही मोक्याची जागा हेरून याठिकणी भाजपनं वाचनालय सुरू करण्याचा घाट घातलाय. त्यामुळे येत्या काळात या अनधिकृत वाचलनालयावरून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा