Advertisement

वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भाजप नगरसेवकावर गुन्हा

वाढदिवसाची पार्टी करणं नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकाला चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी या नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.

वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भाजप नगरसेवकावर गुन्हा
(Representational Image)
SHARES

वाढदिवसाची पार्टी करणं नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकाला चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी या नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. निलेश बाविस्कर असं या नगरसेवकाचं नाव आहे. 

निलेश बाविस्कर हे खारमधील भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी रविवारी रात्री आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेकजण उपस्थित होते. पार्टीचं आयोजन करून गर्दी केल्याने खारघर पोलिसांनी निलेश बाविस्कर यांच्यावर कोरोना संदर्भातील शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दखल केला आहे. खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, आपण कोणत्याही पार्टीचं आयोजन केलं नव्हतं तसंच गर्दीही झाली नव्हती. नागरिक आपल्यावरील प्रेमापोटी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आपण कायद्याचे उल्लंघन केलेलं नाही, असा दावा बाविस्कर यांनी केला आहे.

बाविस्कर यांनी सेक्टर १८ मधील आपल्या कार्यालयात रविवारी रात्री वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होती. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू असल्याने काही नागरिकांनी खारघर पोलिस ठाण्यात फोन करून तक्रारी केल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बाविस्कर यांच्या कार्यालयाजवळ गर्दी आढळून आली.हेही वाचा -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णयRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement