Advertisement

जिथं पोलीसच सुरक्षित नाही, तिथं जनता सुरक्षित कशी असेल?

हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात मुंबई पोलिसांना नको ती कामं करावी लागत आहेत. गेल्या दीड वर्षांचा लेखाजोखा पाहता कित्येक पोलिसांनी आत्महत्या केली आहे.

जिथं पोलीसच सुरक्षित नाही, तिथं जनता सुरक्षित कशी असेल?
SHARES

हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात मुंबई पोलिसांना (mumbai police) नको ती कामं करावी लागत आहेत. गेल्या दीड वर्षांचा लेखाजोखा पाहता कित्येक पोलिसांनी आत्महत्या केली आहे. मविआ सरकारच्या राजवटीत पोलीसच सुरक्षित नाहीत, तर गोरगरीब जनता कशी सुरक्षित असेल, असा प्रश्न विचारत भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सचिन वाझे प्रकरणानंतर आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवत त्यांच्याजागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु सचिन वाझे किंवा परमबीर सिंग हे तर केवळ प्यादेच असून खरे सूत्रधार सरकारमध्ये बसले आहेत, असा आरोप करतानाच विरोधी पक्ष भाजपकडून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. 

याच संदर्भात ट्विट करत मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या आजच्या अवस्थेला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं भाजपने म्हटलं आहे. शिवाय या प्रश्नाची उत्तरं अनिल देशमुख यांच्याकडे मागितली आहेत. 

हेही वाचा- “मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण कधीच झालं नव्हतं”

जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जातंय!

ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सामान्य जनतेसह पोलीससुद्धा आत्महत्येला बळी पडत आहेत. गेल्या दीड वर्षांचा लेखाजोखा पाहता कित्येक पोलिसांनी आत्महत्या केली आहे. मविआ सरकारच्या राजवटीत पोलीसच सुरक्षित नाहीत, तर गोरगरीब जनता कशी सुरक्षित असेल, गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी यावर उत्तर द्यावं.

पोलिसांच्या आत्महत्या फक्त एखाद्या भागातलाच प्रश्न नाहीय. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात सगळीकडेच पोलिसांच्या आत्महत्येचं लोण पोहोचलेलं आहे. हे लक्षात येण्याइतकी संवेदनशीलता गृहमंत्री आणि ठाकरे सरकारकडे नाही, हे पोलिसांचं दुर्दैव, अशा शब्दांत भाजपने ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

(bjp criticizes thackeray government over pressure on maharashtra police)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा