माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आलं असलं किंवा निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) च्या अटकेत असले, तरी त्यांचे खरे सूत्रधार हे सरकारमध्ये बसले आहेत, त्यांचा एनआयएने तपास करून सत्य जनतेपुढं आणण्याची गरज असल्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन यांचं नाव पुढं येताच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांच्या जीवाला धोका असल्याचं वारंवार सांगूनही सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तपास अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात हात असल्याचं हिरेन यांच्या पत्नीने जबाब देऊनही सरकारने वाझे यांची पाठराखण केली. वाझे यांच्याकडे अशी नेमकी कोणती संवेदनशील माहिती आहे? की ती उघड होण्याच्या भीतीपोटी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपस्थित केले.
वाझे यांच्या अटकेनंतर स्फोटक प्रकरणातील अनेक पुरावे ‘एनआयए’ला मिळाले आहेत. हा मोठ्या कटकारस्थानचा हिस्सा असू शकतो. हा सगळा प्रकार सचिन वाझे एकटेच करू शकत नाही. सचिन वाझे हे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. मुंबई पोलीस (mumbai police) आयुक्तांनंतर वाझे असं समीकरण झालं होतं.
हेही वाचा- पूजा चव्हाण, हिरेन प्रकरणातील पुराव्यांसोबत छेडछाड?, भाजपचा आरोप
उद्धव ठाकरे असो वा अनिल देशमुख महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत वाझेच दिसायचे. महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी वाझेच का करत होते? स्फोटकांचं प्रकरणही वाझे यांच्याकडेच कसं गेलं? खरं तर परमबीर सिंग किंवा सचिन वाझे ही फार छोटी माणसं आहेत. त्यांना नेमके कुणाचे आशीर्वाद होते, याच्या मुळापर्यंत एनआयएने जायला हवं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.The ATS and NIA have tapes with #SachinWaze ’s voice & conversations. Both cases being inter related,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2021
we demand that now #MansukhHiren murder case should also be probed by the @NIA_India pic.twitter.com/dbOxvWp751
मी मुख्यमंत्री असताना २०१८मध्ये शिवसेनेचे (shiv sena) कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निलंबित वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती त्यांच्या काही नेत्यांमार्फत केली होती. पण महाधिवक्त्यांशी चर्चा केल्यावर वाझे यांना सेवेत न घेण्याचा निर्णय घेतला. निलंबित झाल्यानंतर वाझे शिवसेनेत गेले, पक्षाचे प्रवक्ते झाले. शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंधही होते.
उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मुख्यमंत्री होताच कोरोनाचे कारण देत वाझे याच्यासारख्या खंडणीबहाद्दर पोलिसाला गेल्या वर्षी पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आलं. त्यानंतर ते राज्य सरकारसाठी ‘वसुली अधिकारी’ बनले होते. हा सर्व उघडकीस आलेला प्रकार म्हणजे केवळ पोलिसांचं अपयश नव्हे, तर महाविकास आघाडी सरकारचं हे अपयश असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
(find a culprit behind sachin vaze devendra fadnavis demands to NIA)