Advertisement

पूजा चव्हाण, हिरेन प्रकरणातील पुराव्यांसोबत छेडछाड?, भाजपचा आरोप

सांताक्रूझच्या फॉरेन्सिक लॅबमधे पाठवण्यात आलेल्या संजय राठोड प्रकरणातील आॅडिओ क्लिप तसंच मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड सुरु असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

पूजा चव्हाण, हिरेन प्रकरणातील पुराव्यांसोबत छेडछाड?, भाजपचा आरोप
SHARES

सांताक्रूझच्या फॉरेन्सिक लॅबमधे पाठवण्यात आलेल्या संजय राठोड (sanjay rathod) प्रकरणातील आॅडिओ क्लिप तसंच  मनसुख हिरेन प्रकरणातील  शवविच्छेदन अहवालात छेडछाड सुरु असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सोबतच या दोन्ही प्रकरणातील पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी देखील शेलार यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना आशिष शेलार (ashish shelar) यांनी सांगितलं की, ठाकरे सरकारने विश्वासघातातून जन्म घेतलेला असला, तरी हे ठाकरे सरकार हेराफेरीच्या धंद्यातून स्वत:ला बाजूला ठेवू शकलेलं नाही. या सरकारच्या हेराफेरीची रोज नवी प्रकरणं उघडकीस येत आहेत. पूजा चव्हाण या तरूणीच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी दबाव टाकल्यानंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात डझनभर आॅडियो क्लिप बाहेर आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची मागणी केल्यावर चौकशी सुरू झाली. परंतु कलिनातील फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या या आॅडियो क्लिपमध्ये छेडछाड सुरू असल्याचा आम्हाला संशय आहे.

हेही वाचा- सचिन वाझे, अनिल देशमुख ते परमबीर सिंग, शरद पवारांनी दिली सगळ्या प्रश्नांची उत्तरं

त्याच प्रमाणे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर ठाण्यात ज्या ठिकाणी त्यांचं शवविच्छेदन झालं, त्या आॅटाॅप्सी रिपोर्टमध्येसुद्धा काही गोष्टी लपवल्या जात आहेत. काही गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. संपूर्ण अॅटाॅप्सीचं व्हिडिओ रेकाॅर्डिंग पोलिसांना मिळालेलं नाही, अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या बाबतीतले पुरावे देखील नष्ट केले जातील, या प्रकारचं वर्तन सरकारच्या माध्यमातून पोलीस यंत्रणांचं होतंय का? अशी आम्हाला शंका आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या दोन्ही प्रकरणातील पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणात तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नसलं तरी अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा दावा एनआयएने केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पीपीई किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला आहे, असं एनआयएने म्हटलं आहे.

मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांचा अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणातील कथित सहभागाचा तपास एनआयए करत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. या प्रकरणातही संशयाची सुई सचिन वाझे यांच्यावरच आहे. 

(bjp mla ashish shelar demands to investigate evidence in pooja chavan and mansukh hire suicide case from independent investigative team)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा