Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

सचिन वाझे, अनिल देशमुख ते परमबीर सिंग, शरद पवारांनी दिली सगळ्या प्रश्नांची उत्तरं

महाराष्ट्रात सचिन वाझे प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का? मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवणार का? असे प्रश्न भाजपकडून विचारले जात आहेत.

सचिन वाझे, अनिल देशमुख ते परमबीर सिंग, शरद पवारांनी दिली सगळ्या प्रश्नांची उत्तरं
SHARES

महाराष्ट्रात सचिन वाझे प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा राजीनामा घेणार का? मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवणार का? असे प्रश्न भाजपकडून विचारले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

सचिन वाझे प्रकरणावरून सरकार अडचणीत येणार असल्याचा दावा विरोधक भाजपकडून केला जात असल्याचं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता शरद पवार म्हणाले की, एका सब इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाराच्या अटकेचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असं मला वाटत नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर तपासाला सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, हे तपासातून निष्पण्ण झाल्यास, अशा लोकांवर योग्य ती कारवाई होईलच. 

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवणार की नाही, हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा, असंही शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी सीडीआर तपास यंत्रणांना द्यावा- सचिन सावंत

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ताबडतोब पक्षाची बैठक घेतल्याने अनिल देशमुख यांची मंत्रीपदावरून गच्छंती होणार यावर चर्चा रंगायला लागल्या. त्यावर बोलताना महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणात जबाबदारी पार पाडली आहे आणि जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांसमोर आणलं, असं म्हणत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली. 

सोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. ज्या काही समस्या येतात, त्या सर्व सहकारी एकत्र बसून सर्वसहमतीने सोडवत असल्याचं सांगत, राज्य सरकारला कुठलाही धोका नसल्याचं सांगितलं.   

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे असल्याचं त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे फडणवीस यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी आणि गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

(ncp chief sharad pawar reaction on sachin vaze and anil deshmukh)

हेही वाचा- “महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तोंडावर अन् ठाकरे सरकार राजकारणात दंग”

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा