Advertisement

हिंदी भाषिकांसाठी चाणक्य नाटकांचे आयोजन


हिंदी भाषिकांसाठी चाणक्य नाटकांचे आयोजन
SHARES

कुरारगाव - मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपानं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी उत्तर भारतीयांमध्ये प्रसिद्ध असलेल्या चोखा बाटी कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषिकांशी संवाद साधल्यावर आता हिंदी भाषिकांसाठी आयोजित चाणक्य मंचन या हिंदी नाटकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार आहेत. मालाड कुरारगाव येथील वीर सावरकर मैदानात मोहित कम्बोज फाउंडेशनच्या वतीने चाणक्य मंचन या हिंदी नाटकाचे रविवार 20 नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मॉरिशियसचे प्रधानमंत्री अनिरुद्ध जुगनाउथजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंदजी उपस्थित राहणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा