पालिकेवर भगवा फडकणारच - उद्धव ठाकरे

Pali Hill
पालिकेवर भगवा फडकणारच - उद्धव ठाकरे
पालिकेवर भगवा फडकणारच - उद्धव ठाकरे
पालिकेवर भगवा फडकणारच - उद्धव ठाकरे
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबई महापालिकेचे काम पारदर्शक आहे. भाजपच्या साथीशिवाय मुंबईत एकही काम झालेलं नाही. असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिकेवर भ्रष्टाराचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले. या वेळी मुंबईत काव-काव करणारे खुप कावळे आहेत असं म्हणत मार्चमध्ये पुन्हा महापालिकेत निवडून येईन असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. थोर समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचं सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेत अनावरण झालं. या वेळी ते बोलत होते.

जातीयता आणि चुकीच्या प्रथा-पंरपरा, हुंडाबंदी विरोधात जावून प्रबोधनकारांनी कामे केली, मात्र त्यांचे तैलचित्र लावायला उशीर झाला, त्यांच्या विचारांना आणि संघर्षाला आम्ही न्याय देवू शकलो नाही, अशी खंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली.
दरम्यान, तैलचित्राबरोबरच सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, दुकानं आणि आस्थापना नोंदणी ऑनलाइन पोर्टल, खासगी शाळांना मान्यताप्राप्त ऑनलाइन परवानगीचे लोकापर्ण आणि मुंबई अग्निशमन दलाच्या कॉफी टेबल बूक या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. याप्रसंगी, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, खासदार अरविंद सावंत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.