कोकणी मतांवर भाजपचा डोळा

  Pali Hill
  कोकणी मतांवर भाजपचा डोळा
  मुंबई  -  

  कोकणनगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी, कोकणी मतांवर डोळा ठेऊन भाजपाच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीये. याचाच भाग म्हणून भाजपाच्या कोकण विकास आघाडीतर्फे एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यातून कोकणातील गावांचे प्रमुख नेमण्यात येतील.

  भांडुपसह कांजुरमार्ग, विक्रोळी आणि मुलुंड या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. पूर्वी हा पट्टा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कोकणातले बहुतांश चाकरमानी याच पट्ट्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे कोकणातील गावांचा विकास करण्यासाठी प्रत्येक गावात मुंबईत राहणारी एक व्यक्ती प्रमुख म्हणून नेमण्याचा भाजपाचा विचार आहे. या व्यक्तिच्या मदतीने त्या गावाचे प्रश्न मुंबई पातळीवर मंत्रालयातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं एका भाजपा पदाधिकाऱ्यानं सांगितलं. मेळाव्याला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद जठार आदी उपस्थित असतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.