Advertisement

भाजपचीच भाजपवर टीका, म्हणे हे 'फूल इन महाराष्ट्र'!

भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हे ट्विट पडलं आणि सर्वचजण चक्रावून गेले, नव्हे अनेक नेटिझन्स चक्क उडालेच! सोशल मीडियावरून भाजपची टर उडवण्यास सुरूवात झाली.

भाजपचीच भाजपवर टीका, म्हणे हे 'फूल इन महाराष्ट्र'!
SHARES

'राज्यात एकीकडे दोन लाख सरकारी कर्मचाऱ्यांची गरज असताना फडणवीस सरकार मात्र कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्क्याने कमी करण्याच्या विचारात आहे. हे मेक इन महाराष्ट्र नव्हे तर तर हे फूल इन महाराष्ट्र अाहे', असं ट्विट भारतीय जनता पार्टीच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर पोस्ट झालं आणि महाराष्ट्रभरात भाजपाला ट्रोल केलं जाऊ लागलं.

फडणवीस सरकारवर, भाजपा सरकारवर टीका करणारं हे ट्विट विरोधी पक्ष वा इतर कुणी केले नसून हे ट्विट खुद्द भाजपानेच केले आहे! हो, हे खरं आहे.



काय झाला प्रकार?

भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवर रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हे ट्विट पडलं आणि सर्वचजण चक्रावून गेले, नव्हे अनेक नेटिझन्स चक्क उडालेच! सोशल मीडियावरून भाजपाची टर उडवण्यास सुरूवात झाली. ही चूक भाजपाच्या लक्षात येईपर्यंत जवळपास अर्ध्या नेटकरी मराठी माणसांपर्यंत हे ट्विट पोहोचलं होतं. तब्बल तासाभरानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर हे ट्विट भाजपाकडून डिलीट करण्यात आलं खरं. पण सोशल मीडियावर त्यानंतरही या ट्विटचीच चर्चा सुरू होती, टर उडवली जात होती.






भाजपा म्हणतंय ते ट्विट आमचे नव्हेच!

दरम्यान, भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरून सरकारविषयी असे कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलेले नाही, त्यामुळे यात काही तरी काळेबेरे असल्याचे म्हणत भाजपाने आता थेट सायबर सेलकडेच धाव घेतली आहे. भाजपाच्या ट्विटर हॅण्डलशी छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत हा प्रकार नेमका कसा घडला? याची चौकशी करण्याची मागणी नुकतीच सायबर सेलकडे एका तक्रारीद्वारे केल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.

उपाध्ये यांच्या तक्रारीनुसार भाजपा महाराष्ट्रचे @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्विटर हॅण्डल आहे. भाजपाचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हॅण्डल वापरतात. ३ नोव्हेंबर रोजी मेरखेड अथवा अन्य कोणीही पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्विट केलेले नाही. त्यामुळे भाजापाचे ट्विटर हॅण्डल हॅक करून हे ट्विट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपाच्या ट्विटर हॅण्डलचा दुरूपयोग करण्यात आलेला नाही ना? अशीही शंका व्यक्त करत यादृष्टीनेही चौकशीची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा

मला निवडून येण्याची चिंता नव्हती, पण भाजपाने विश्वास ठेवायला हवा होता- राणे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा