Advertisement

मला निवडून येण्याची चिंता नव्हती, पण भाजपाने विश्वास ठेवायला हवा होता- राणे

नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या जागेसाठी सोमवारी भाजपाकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर भाजपाने भ्रमनिरास केल्याचं राणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे.

मला निवडून येण्याची चिंता नव्हती, पण भाजपाने विश्वास ठेवायला हवा होता- राणे
SHARES

''मला निवडून येण्याची येण्याची चिंता नव्हती फक्त भाजपाने त्यावर थोडा विश्वास ठेवायला हवा होता'' अशी प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मनातील खंत व्यक्त केली.

नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या जागेसाठी सोमवारी भाजपाकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर भाजपाने भ्रमनिरास केल्याचं राणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे.


माझ्याविरुद्ध एकत्र येणं हाच विजय  

विधानपरिषदेतील पोटनिवडणुकीसाठी माझ्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र येणं हाच माझा विजय असल्याचं सांगत नारायण राणे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर जोरदार टीका केली. या तिघांविरोधात माझी निवडणूक लढवण्याची तयारी होती. जे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पक्षातील आमदाराला हाक देखील मारायचे नाहीत त्यांचं काँग्रेसचे आमदार ऐकणार का? आताही मी निवडणुकीसाठी उभा राहिलो असतो, तर मलाच काँग्रेसची सर्वाधिक मतं मिळाली असती, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सगळ्या पक्षातून मला फोन आले. तुम्ही उभे रहा आम्ही निवडून देतो, असं सांगत मी जरी उभा राहिलो नसलो तरी मी भाजपाला मदत करणार असं राणेंनी यावेळी सांगितलं.

तर, शिवसेनेच्या मतांबाबत विचारलं असता, कोण विचारतंय शिवसेनेला? उलट मलाच शिवसेनेची मतं मिळाली असती, असं म्हणत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.


मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून...

मुख्यमंत्र्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे की मी राणेंना मंत्री करणार. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. माझी आणि मुख्यमंत्र्यांची रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी मला मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ते मला पटलं म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया राणे यांनी यावेळी दिली.हेही वाचा-

काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांनी भरला उमेदवारी अर्ज


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा