Advertisement

काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांनी भरला उमेदवारी अर्ज


काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांनी भरला उमेदवारी अर्ज
SHARES

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. माने हे सोलापूरचे माजी आमदार आहेत.


आघाडीचा संयुक्त उमेदवार

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने माने यांच्या रूपाने आपला संयुक्त उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते की, राणेंनी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरी आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आहोत. येत्या ७ डिसेंबर रोजी या जागेसाठी निवडणूक होणार आहे.


जिंकण्यासाठी हवीत 'इतकी' मतं

या जागेसाठी २९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विधान परिषदेच्या या जागेवर विजय मिळविण्यासाठी १४५ आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ८१ आमदार आहेत.


काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, सपा असे आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत. दिलीप माने यांची उमेदवारी आज निश्चित करण्यात आली असून या जागेवर आम्ही विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीत अदृश्य बाण देखील सुटू शकतील. पण एकूणच काँग्रेससाठी वातावरण चांगलं आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस


राजकारणात काहीही घडू शकतं. त्यामुळे अंकगणित नक्कीच जुळू शकेल.
- दिलीप माने, उमेदवार, काँग्रेस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement