भाजपाच्या यादीत नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान

 Mumbai
भाजपाच्या यादीत नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान
भाजपाच्या यादीत नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान
See all
Mumbai  -  

मुंबई - शिवसेनेनं ज्या प्रकारे आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले, त्याचप्रकारे भाजपा नेत्यांनीही उमेदवारांच्या नावांची घोषणा न करता आपल्या 62 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं. राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित, विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर, नील किरीट सौमय्या, आमदार अमित साटम यांचे मेहुणे रोहन राठोड, तसंच भारती लव्हेकर यांचा भाचा योगीराज दाभाळकर यांना स्थान देण्यात आलं आहे. तर, आशिष शेलार यांचे बंधू विद्यमान नगरसेवक विनोद शेलार यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेमधून भाजपामध्ये दाखल झालेले मंगेश सांगळे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Loading Comments