Advertisement

ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव- विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही. कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव- विजय वडेट्टीवार
SHARES

ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही. कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ओबीसी नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केला. 

अनुसुचीत जाती आणि जमाती सोडून इतर कुठल्याही जातीचा जनगणनेत समावेश केला जाणार नाही, शिवाय केंद्राकडे असेलला डाटाही देणार नाही, असं लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राॅय यांनी मंगळवारी दिलं होतं. 

त्यावर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना वडेट्टीवारांनी केंद्रावर हे आरोप केले. ते म्हणाले, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राॅय यांनी नुसुचीत जाती आणि जमाती सोडून कुठल्याही जातीची जातीनुसार जनगणना होणार नाही, असं लेखी उत्तर दिलं आहे. कालच्या केंद्राच्या लेखी उत्तरातून ओबीसी समाजाची घोर निराशा आणि फसवणूक झाल्याचं सिद्ध झालं आहे.  

हेही वाचा- ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी पुढाकार घ्यावा- देवेंद्र फडणवीस

याशिवाय नित्यानंद राॅय यांनी असंही म्हटलं आहे की, २०११ मध्ये जी जनगणना झाली होती, त्याचा डेटासुद्धा आम्ही देऊ शकत नाही. यातून असंच दिसतंय की केंद्रातील हे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत गंभीर तर नाहीच, पण त्यांची नियतसुद्धा साफ नाही, अशा प्रकारचं चित्र त्यांच्या वक्तव्यानंतर समोर आलं आहे.

त्यामुळे राज्यातील भाजपच्या (bjp) नेत्यांनी स्पष्ट करावं की, आता तुमची भूमिका काय? ओबीसी आरक्षणाविषयी भाजपची दुतोंडी भूमिका आहे. याबाबत भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झाला आहे. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसं सांगत असतात तसं ते बोलत असतात, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर हल्ला चढवला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा