Advertisement

ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी पुढाकार घ्यावा- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी सकाळी भेट घेतली.

ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी पुढाकार घ्यावा- देवेंद्र फडणवीस
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी सकाळी भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत चर्चा झाली. सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी छगन भुजबळ यांनी आज भेट घेऊन चर्चा केली. मी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात संपूर्ण मदत करेन, असं अश्वासन त्यांना दिलं आहे.

हेही वाचा- ‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच पृथ्वीराज चव्हाण यांची रित- भाजप

ओबीसींचा 'इम्पिरिकल डेटा' कसा गोळा करता येईल. यासंदर्भात आम्ही चर्चा केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करत आहे. फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी हे सहज शक्य आहे, असं मी भुजबळांना सांगितलं आहे. हा प्रश्न राज्यातच सुटण्यासारखा आहे. शेवटी नेतृत्व सरकारलाच करायचं असतं. त्यामुळं भुजबळांनी याप्रश्नी पुढाकार घ्यावा, असं आवाहन देखील मी त्यांना केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी 5 जुलै 2021 रोजी विधानसभेत बोलताना, 2011 साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत 8 कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात 69 लाख चुका आहेत. 

तर, केंद्र सरकारनेच संसदीय समिती समोर दिलेल्या माहितीनुसार 99 % एसईसीसी डेटा त्रुटीरहित आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची आकडेवारी सांगून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केली, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा