Advertisement

‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच पृथ्वीराज चव्हाण यांची रित- भाजप

स्वत:च्या चुका झाकण्यासाठी वेगळीच भूमिका घेत आधीच दिशाभूल करून मोकळे व्हायचे, ही त्यांची कार्यपद्धती राज्याला परिचित आहे.

‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच पृथ्वीराज चव्हाण यांची रित- भाजप
SHARES

काँग्रेस पक्षात असल्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची रित आहे. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी वेगळीच भूमिका घेत आधीच दिशाभूल करून मोकळे व्हायचे, ही त्यांची कार्यपद्धती राज्याला परिचित आहे, अशा शब्दांत भाजपने (bjp) चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

मुळात केंद्र सरकारने राज्यांना जे पत्र 3 जुलै 2015 रोजी पाठविले, त्या एसईसीसी डेटामध्ये 8.19 कोटी चुका सांगितल्या होत्या. 6.73 कोटी चुकांच्या दुरूस्तीनंतर सुद्धा 1.45 कोटी चुका शिल्लक राहिल्या.

राज्यनिहाय चुकांची वर्गवारी पाहिली तर सर्वाधिक 69.1 लाख चुका या महाराष्ट्रातील. इतर राज्यांतील चुकांचे प्रमाण हे 1 ते 14 लाख दरम्यान. म्हणजे 14 लाखांवर चुका कुठल्याच राज्यात नाही.

हेही वाचा- शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?, चर्चा निराधार असल्याचा नवाब मलिक यांचा दावा

आता प्रश्न निर्माण होतो तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जी आकडेवारी गोळा झाली, त्यातच सर्वाधिक चुका कशा? लोकांची दिशाभूल करताना आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न न करता या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे, असं आव्हान भाजपने दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी 5 जुलै 2021 रोजी विधानसभेत बोलताना, 2011 साली केलेल्या एसईसीसी जनगणनेत 8 कोटी चुका असून एकट्या महाराष्ट्रात 69 लाख चुका आहेत. 

तर, केंद्र सरकारनेच संसदीय समिती समोर दिलेल्या माहितीनुसार 99 % एसईसीसी डेटा त्रुटीरहित आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची आकडेवारी सांगून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केली, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

(bjp criticizes congress leader prithviraj chavan on obc reservation)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा