Advertisement

शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?, चर्चा निराधार असल्याचा नवाब मलिक यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?, चर्चा निराधार असल्याचा नवाब मलिक यांचा दावा
SHARES

कालपासून माध्यमांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या बातम्या निराधार आहेत, पेरण्यात आल्या आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. 

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झालेली नाही वा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. 

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बेस्ट! लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटकावलं नाव

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर किशोर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची देखील भेट घेतली आहे. यामुळे शरद पवार (sharad pawar) हे राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

त्यावर, शरद पवार यांनी खुलासा करताना म्हटलं की, प्रशांत किशोर मला दोनदा भेटले. त्यावेळी आमच्यात फक्त त्यांच्या कंपनीविषयी चर्चा झाली. सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील नेतृत्व वा राष्ट्रपतीपदाची निवडणूक यांवर आमच्यात काहीही चर्चा झाली नाही. 

एका पक्षाकडे इतकं संख्याबळ असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली तर कोण जिंकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. २०२४ मधील निवडणुकीच्या नेतृत्वाबाबत अद्याप काहीही चर्चा झालेली नाही, काहीही निर्णय झालेला नाही. निवडणूक रणनितीच्या कामातून मी आता बाहेर पडलो आहे, असं किशोर यांनी मला सांगितलं. राजकीय परिस्थिती सतत बदलती असते, असंही त्यांनी नमूद केलं. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा