शिवस्मारकाच्या कलश यात्रेवर मेटे नाराज

  Pali Hill
  शिवस्मारकाच्या कलश यात्रेवर मेटे नाराज
  मुंबई  -  

  मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची एकीकडी जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे नाराज असल्याचं चित्र आहे. शिवस्मारकाच्या कलश यात्रेतून मेटेंनी काढता पाय घेत भाजपावर टीका केली आहे. कलशांची शोभायात्रा म्हणजे भाजपाचं निव्वळ शक्तीप्रदर्शन असल्याची नाराजी विनायक मेटेंची व्यक्त केली. कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केलं जात असल्याचा थेट आरोप विनायक मेटेंनी केला. हा कार्यक्रम महाराजांच्या सन्मानासाठी नाही तर केवळ शतप्रतिशत भाजपा हा अजेंडा राबवण्यासाठी असल्याची टीका मेटेंनी केली. हा कार्यक्रम शिवमय नाही तर भाजपामय झाल्याचं म्हणत भाजपावर शरसंधान साधले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.