Advertisement

कोरोना चाचणी नसल्यानं राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना चाचणी न केल्यामुळं त्यांना विधान भवनात प्रवेश नाकारण्यात आला.

कोरोना चाचणी नसल्यानं राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना चाचणी न केल्यामुळं त्यांना विधान भवनात प्रवेश नाकारण्यात आला. विधान भवनात प्रवेश घेण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, केवळ चाचणी न केल्यानं राज ठाकरे यांना प्रवेश नाकारण्यात आला. या प्रकरणी भाजपाचे नेते अतुल भातखळकर ट्विट करत '२५ आमदारांना कोरोना चाचणी नसल्यामुळं विधान भवनात प्रवेश नाकारला. तसंच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कोरोनाची चाचणी नसल्यामुळं प्रवेश दिला नाही. मात्र मोहन डेलकर कुटुंबियांना भेटलात हे उत्तम, असं म्हणत नियम सर्वांना सारखेच हवेत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा पुन्हा वाढलेला संसर्ग, वीजबिल तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी २ मार्च रोजी विधान भवनात येत होते. मात्र, विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणं अनिवार्य करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी कोरोनाची चाचणी केलेली नव्हती. त्यामुळं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच विधान भवनाच्या आवारातून माघारी फिरले होते.

दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येत होतं. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली.

मोहन डेलकर यांच्या कुटंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आम्हाला केंद्र सरकारनं मदत केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा योग्य तपास होईल, अशी अपेक्षा मोहन डेलकर यांच्या पुत्रानं व्यक्त केली. तसंच, या मोहन डेलकर यांना गेल्या १६ महिन्यांपासून प्रचंड त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र उद्धव ठाकरेंनी मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानं भाजपानं निशाणा साधला आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा