Advertisement

अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई- चंद्रकांत पाटील

अर्णब गोस्वामीवर केवळ सुडाच्या भावनेतून कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई- चंद्रकांत पाटील
SHARES

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते आक्रमक झाले असून राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका सुरू केली आहे. अर्णब गोस्वामीवर केवळ सुडाच्या भावनेतून कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एवढंच नाही, तर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये अर्णबच्या अटकेविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला.

भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. 

हेही वाचा- 'त्या' प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य  सरकारचा आंदोलन करून विरोध करा - उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा, असं आवाहन चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविलं होतं, आता देखील थांबवणार, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (bjp leader chandrakant patil criticised maharashtra government on arnab goswami arrest)

हेही वाचा- चॅप्टर केसच्या चौकशीला अर्णब गोस्वामी दुसऱ्यांदा गैरहजर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा