Advertisement

टिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…

मालाडमधील क्रिडा संकुलनाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले आहेत.

टिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…
SHARES

मालाडमधील क्रिडा संकुलनच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले आहेत. यावरूनच फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.

सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय. तर काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. क्रिडा संकुलाच्या उद्घटनानंतर अस्लम शेख यांनीही भाजपवर जोरदार पलटवार केलाय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात आणि हिंदूंवर अनन्वित करणार्‍या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भाजपा, विहिंप ,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक! याचा तीव्र निषेध अशा आशयाचे ट्विट केले.

टिपूच्या नावानं नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही. असे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही केलं आहे.

भाजपच्या नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

बुधवारी भाजपनं (Bjp) टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाला जोरदार विरोध दर्शवत आक्रमक आंदोलन केलं होतं. यात अनेक भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही पाहायला मिळालं. भाजपबरोबर या आंदोलनात बजरंग दलही सामील असल्यानं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.



हेही वाचा

मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव, भाजप आक्रमक

भाजपा व मनसे युतीला पुर्णविराम; मनसेशिवाय निवडणूक लढविण्याचा भाजपाचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा