Advertisement

मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव, भाजप आक्रमक

मुंबईतील परिसरातील एका मैदानाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात आल्यामुळे भाजप अणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे.

मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव, भाजप आक्रमक
SHARES

मुंबईतील मालाड परिसरात नव्यानं बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय खळबळ उडाली आहे. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या नावावरून राज्य सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनी मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.

टिपूला हिंदुद्रोही शासक ठरवून विहिंप आणि भाजप विरोध करत आहेत. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे नामकरण कसे करू दिले, असा सवाल भाजपनं उपस्थित केला आहे.

मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे आहे. टिपू सुलताननं आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीनं धर्मांतर केले असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे.

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी म्हटलं आहे की, ''२४ तासांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलत होते आणि आता त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मैदानाला टिपू सुलतानचे नाव दिले जात आहे. ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली त्यांचे मंत्री टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन करणार आहेत. हिंदूंवर अत्याचार करणारे सर्व आक्रमक आता थडग्यातून उठतील आणि शिवसेनेला विजयी करा.''



हेही वाचा

'किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल' - नवाब मलिक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा