Advertisement

'किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल' - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर खोचक टीका केली आहे.

'किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल' - नवाब मलिक
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर खोचक टीका केली आहे. किरीट सोमय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.

नवाब मलिकांनी किरीट सोमय्यांवर बोचरी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना मलिक म्हणाले की, 'एखादा चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटामध्ये आयटम गर्लची आवश्यकता असते. किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे', अशी टीका मलिक यांनी केली.

भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्यानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करत असतात. विविध कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

यावरुन अनेक नेत्यांविरोधात ईडीनं कारवाईदेखील सुरू केली आहे. यावरुनच नवाब मलिकांनी किरीट सोमय्यांवर बोचऱ्या शब्दात टिप्पणी केली आहे.हेही वाचा

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्ग

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा