Advertisement

Devendra Fadnavis: बाळासाहेबांचा सामना आता शिल्लक राहिलेला नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक राहिलेला नाही. तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे, अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

Devendra Fadnavis: बाळासाहेबांचा सामना आता शिल्लक राहिलेला नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका
SHARES

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना (bjp leader devendra fadnavis criticised shivsena and saamana) आता शिल्लक राहिलेला नाही. तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे, अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती. चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे. सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ श्री. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, देव पळून गेले, हे सामना प्रकाशित करतं. तर मुख्यमंत्री विठ्ठलाला साकडे घालतात. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक नाही. तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. 

हेही वाचा - Devendra Fadnavis: मुंबईत ८०६ रुग्ण आढळल्यावर थोडं बरं वाटलं, पण खरं कारण वेगळंच- फडणवीस

नाशिक दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंगळवारी मुंबईत थोडे कमी म्हणजे ८०६ रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटलं. पण नंतर कळलं की मुंबईत मंगळवारी केवळ ३३०० चाचण्या झाल्या आहेत. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल तर सरकारला मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला, याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी कोरोनाविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा