Advertisement

‘हे’ कुठलाही शेतकरी करू शकत नाही, हिंसाचारावर निलेश राणेंचं ट्विट

शेतकरी मोर्चामध्ये बाहेरच्या व्यक्तींनी शिरून हिंसाचार घडवून आणला असून त्याला विरोधकांचं समर्थन असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

‘हे’ कुठलाही शेतकरी करू शकत नाही, हिंसाचारावर निलेश राणेंचं ट्विट
SHARES

दिल्लीत प्रजासत्ता दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा जोरदार खेळ सुरू आहे. शेतकरी मोर्चामध्ये बाहेरच्या व्यक्तींनी शिरून हिंसाचार घडवून आणला असून त्याला विरोधकांचं समर्थन असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी एक व्हिडिओ ट्विट करत असा हिंसाचार कुठलाही शेतकरी करू शकत नाही, असा दावा केला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लाल किल्ल इथं झालेल्या हिंसाचाराचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तुफान धुमश्चक्री होताना पाहायला मिळत आहे. 

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं?? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती; पण आजपर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे??? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा- तुमची तोंडं आता का शिवली आहेत ?, आशिष शेलारांचा पवार-राऊत यांना सवाल

त्याआधी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शरद पवार (sharad pawar) आणि संजय राऊत यांच्यावर हिंसाचाराचं समर्थन केल्यावरून टीका केली. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला शेतकरी आंदोलकांच्या आडून हिंसाचार घडवून आणण्यात आला. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. पोलिसांवर लाठ्या उचलणं, जवानांना लाथा बुक्क्याने मारणं, तलवारी काढणं कोणत्या देशभक्तीत बसतं हे शरद पवार आणि संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट करावं.

रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही?, असा प्रश्नही आशिष शेलार (ashish shelar) यांनी दोघांना विचारला.

(bjp leader nilesh rane reacts on violence in farmers protest rally)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा