Advertisement

ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर

जळगावमधील एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर
SHARES

जळगावमधील एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेते आक्रमक झाले असून सरकारवर गुन्हा नोंदवण्यासोबतच परिवहन मंत्र्यांना अटक करण्याचीही मागणी होत आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर (pravin darekar) म्हणाले, जळगाव येथील एसटी कर्मचाऱ्याने पगार होत नाही म्हणून कंटाळून आत्महत्या केली. रत्नागिरीतील एका एसटी चालकानेही याचप्रकारे गळफास लावून आत्महत्या केली आहे. हे प्रकार सरकारला शोभणारे नाहीत. जळगावमधील कर्मचाऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये एसटीच्या प्रशासनाला दोष दिला आहे. वेतनाच्या अनियमिततेसाठी एसटी प्रशासन आणि ठाकरे सरकार  जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

अशा परिस्थितीत जेव्हा अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांचं नाव आल्यावर ज्या प्रकारे अर्णबवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, त्याप्रकारे एसटी कर्मचाऱ्याच्या चिठ्ठीत ठाकरे सरकारचं नाव आल्यावर आता कुणाला अटक करणार? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे सरकारवर (thackeray government३०२ कलमांतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे. तसंच येत्या दोन दिवसांत राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा हेच कर्मचारी टोकाचा संघर्ष करती आणि राजकारणापलिकडे जाऊन आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असा इशारा देखील प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.

(bjp leader pravin darekar criticised thackeray government over st bus conductor suicide)


हेही वाचा-

‘या’ आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?- देवेंद्र फडणवीस

एसटी बस कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवलं जबाबदार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा