Advertisement

म्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून जनतेला न्याय मिळत नसल्याने जनता राज्यपालांचा दरवाजा ठोठावत आहे

म्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi government) मंत्र्यांकडून जनतेला न्याय मिळत नसल्याने जनता राज्यपालांचा दरवाजा ठोठावत आहे, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. शिवाय जनता राज्यपालांकडे का जातेयं?, याचं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे, असा सल्लाही सरकारला दिला.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना प्रवीण दरेकर (pravin darekar) म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरुन लक्षात येतं की, “महाविकास आघाडीमध्ये किती आलबेल चाललेलं आहे?” नांदेड महापालिकेसहित कॉंग्रेसच्या ताब्यात असणार्‍या नगरपालिकांना मुख्यमंत्री पैसे देत नाहीत! हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. महाविकास आघाडीमधील पक्षीय विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बदल्या असतील, विकासकामांच्या निधींचं वाटप असेल या सर्व गोष्टींमध्ये सातत्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये वाद-विसंवाद होत आहे. एकंदरीतच या सर्व गोष्टींचा फायदा आपल्यालाच व्हावा, या पक्षीय चढाओढीमध्ये आघाडी सरकारचं महाराष्ट्रातील जनतेकडे आणि विकासकामांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. (bjp leader pravin darekar slams cm uddhav thackeray and maha vikas aghadi government)

सर्वप्रथम ‘आपण म्हणजे महाराष्ट्र’ या भ्रमातून आधी बाहेर येण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक 'नागरिक' हा महाराष्ट्राचा भाग आहे, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील नेते कधी राज्यपालांना भेटले नाहीत का? राज्यपालांकडे (bhagat singh koshyari) प्रश्न घेऊन गेले नाहीत का?

राज्यातील कोव्हिड परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा कायदा सुव्यवस्था या सगळ्या प्रश्नांमधील अपयश झाकण्यासाठीचं अशाप्रकारचा वाद निर्माण करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न या वक्तव्याच्या माध्यमातून दिसून येतो.

मुख्यमंत्र्यांकडून, मंत्र्यांकडून काही कार्यवाही होत नसल्याने, जनतेला न्याय मिळत नसल्याने जनता राज्यपालांचा दरवाजा ठोठावत आहे. जनता आज राज्यपालांकडे का जातेयं?, याचं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे, असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा