Advertisement

“घाबरून सरकारला मंदिरं उघडावीच लागली”

सर्वसामान्यांच्या दबावाला घाबरूनच सरकारला मंदिरं उघडावी लागली, असा दावा भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

“घाबरून सरकारला मंदिरं उघडावीच लागली”
SHARES

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील धार्मिक स्थळं अटी-शर्थींच्या आधारे दर्शनासाठी उघडण्यात आली आहे. त्यानुसार मंदिरं उघडताच भाजपच्या (bjp) नेत्यांनी ठिकठिकाणी जाऊन दर्शन घेत, राज्य सरकारवर जोरदार टीका देखील केली. सर्वसामान्यांच्या दबावाला घाबरूनच सरकारला मंदिरं उघडावी लागली, असा दावा भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

मंदिराची दारं उघडताच राम कदम सपत्नीक वाजत-गाजत, गुलाल उधळत प्रभादेवीतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शनासाठी जाताना राम कदम यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राम कदम म्हणाले की, राज्य सरकारने ज्या दिवशी बीअर बार आणि दारूचे ठेके उघडायला परवानगी दिली, तेव्हाच मंदिरांसाठी नियम तयार करता आले असते. परंतु हे सरकार बदल्यांमध्ये गुंतलेलं असल्याने सरकारने भक्तांच्या भावनांकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केलं. या अहंकारी सरकारला मुद्दामच मंदिरं उघडी करायची नव्हती. अखेर साधूसंत संतप्त झाले, जनतेला आंदोनाचं अस्त्र उपसावं लागलं. त्यामुळं घाबरून सरकारला मंदिरं उघडावी लागली. हा विजय साधूसंतांचा आहे. ११ कोटी जनतेचा आहे. मंदिरातल्या पुजाऱ्यांचा आणि मंदिराबाहेर हार-फूल विकणाऱ्यांचा आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता- प्रवीण दरेकर

सरकारने मंदिरं उघडली असली, तरी पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही, या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडं देण्याची सुबुद्धी राज्यातील ठाकरे सरकारला यावी, असं साकडं आम्ही सिद्धिविनायकाला घालणार आहोत, असंही राम कदम म्हणाले.

राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या आज सणसणीत मुस्काटात बसली आहे. महाराष्ट्राच्या सरकारचा हा मोठा पराभव आहे. परमेश्वराच्या दरबारात चित्रगुप्त नावाची व्यवस्था असते, जी पाप-पुण्याचा हिशेब लिहिते. त्या चित्रगुप्ताच्या दरबारात या सरकारला मोठे शाप मिळणार आहेत. सिद्धिविनायक, साईबाबा, महालक्ष्मी, तुळजाभवानीच्या भक्तांनी या तिन्ही पक्षांना कधीच माफ करू नये, असा संतापही राम कदम यांनी यावेळी व्यक्त केला. 

(bjp leader ram kadam criticised maha vikas aghadi government over temples and religious places reopening)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा