Advertisement

बटन दाबल्यावरच फोडणार डरकाळी!


बटन दाबल्यावरच फोडणार डरकाळी!
SHARES

वाघ आणि शिवसेना हे नाते अख्या महाराष्टाला ठाऊक आहे. शिवसेनेच्या या वाघाला अनेकांनी अनेकदा डिवचण्याचे काम केले. विशेष म्हणजे मित्रपक्ष असलेली भारतीय जनता पार्टीही यात मागे नाही. भाजपा नेत्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा वाघाची प्रतिकृती भेट दिली आहे. गेल्या वर्षी भाजपा नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'व्याघ्रदिना'च्या निमित्ताने उद्धव यांना भेटीदाखल वाघ दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती मुनगंटीवार यांनी पुन्हा केली. पण याखेपेस त्यांनी जुनी भेट देण्यात नवेपण जपले. यंदाचा वाघ हा डरकाळी फोडतो. हो, हो. डरकाळी. पण बटन दाबल्यावरच.

वाघासोबत बांबूपासून तयार केलेला तिरंगादेखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटीदाखल दिला आहे.1 जुलै ते 7 जुलै वनसप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात एेरोलीमधून होणार आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी 'मातोश्री' या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. 

निमित्त जरी वनसप्ताहाचे असले तरी शिवसेनेमध्ये भाजपाबद्दल असलेली नाराज दूर व्हावी, यासाठी भाजपाचे नेते मातोश्रीवर चकरा मारत असल्याची दबक्या आवाजात सुरू होती. दरम्यान गेल्या वर्षी 1 जुलैला युतीचे म्हणून एक झाड माहीमला लावले होेते, ते नीट आहे तुम्ही (माध्यमांनी) काळजी करू नये. मी मातोश्रीवर मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेसाठी आलो नाही, तर निमंत्रण देण्यासाठी आलो होतो असं मिश्किल शैलीत सांगत मध्यावधी निवडणुकीवर बोलणे मुनगंटीवार यांनी टाळले. उद्धव ठाकरे यांनी आपण दिलेले आमंत्रण स्वीकारले आहे, हे सांगायला मुनगंटीवार विसरले नाहीत.


हे ही वाचा -

वाघाचं सिंहावलोकन

'वाघा'शी शत्रुत्व नाही, मित्रत्व करा! सरकारचा नवा संदेश


सुधीर मुनगंटीवार हे मनाने शिवसेना पक्षप्रमुखांच्या जवळचे समजले जातात. शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये वाद-विवाद झडत असतानाही मुनगंटीवार उद्धव आणि पर्यायाने शिवसेनेबाबत सौम्यपणे बोलताना आढळले आहेत. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौ-यात त्यांची उद्धव यांच्याशी झालेली भेट, त्यानंतर पक्षाच्या आमदार-पदाधिका-यांसोबतच्या विशेष बैठकीत शिवसेना ही भाजपाची 'शत्रू क्रमांक एक' असल्याची आक्रमक भाषा आदी पार्श्वभूमीवर एका भाजपा नेत्याने शिवसेना पक्षप्रमुखांना दिलेल्या बटण दाबताच डरकाळी फोडणा-या वाघाची भेट राजकीय वर्तुळात सूचक मानली जात आहे.

संबंधित विषय
Advertisement