Advertisement

बुद्धी गहाण ठेवलीय का? उदयनराजेंचा लेखकाला सवाल

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी… या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना करण्यावरून भाजप नेते ​उदयनराजे भोसले​​​ यांनी नाराजी व्यक्त केली.

बुद्धी गहाण ठेवलीय का? उदयनराजेंचा लेखकाला सवाल
SHARES

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी… या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना करण्यावरून भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. हे पुस्तक लिहिणाऱ्याने बुद्धी गहाण ठेवली का? असा प्रश्नही उदयनराजेंनी उपस्थित केला.

मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पुस्तकावरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, या पुस्तकाबद्दल ऐकून फक्त मलाच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. पण आजकाल कुणीही उठतो आणि महाराजांशी तुलना करतो हे बरोबर नाही. महाराजांनी कधीही घराण्याचं नाव मिरवलं नाही, ते रयतेचे राजे होते. महाराजांसोबत तुलना होईल इतकी उंची जगात कुणाचीही नाही. इतकंच काय तर त्यांच्या जवळपासही कुणी जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. 

हेही वाचा- तर, शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करा, उदयराजेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

प्रत्येक जन्मात एक युगपुरूष जन्माला येतो, ते युगपुरूष शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. त्यांचं नाव जरी काढलं, तरी चैतन्य निर्माण होतं, प्रेरणा मिळते. गेल्या जन्मात मुंगीएवढं पुण्य केलं असेल, म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. पण आपण महाराजांचे वंशज म्हणून कधीही मिरवलं नाही. राजेशाही जाऊन लोकशाही आल्यावर लोकांमधील एक म्हणून मिसळलो, हीच राजांची शिकवण आहे. सत्तेच्या मागे कधीही कुत्र्यासारखं धावलाे नाही.

पण आजकाल सर्वच पक्ष राजकीय स्वार्थ्यासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतात. त्यांच्या जन्मतिथीत घोळ घालून ठेवला. त्यांच्या स्मारकाच्या उभारणीत वाद निर्माण केला. पदोपदी महाराजांचा अपमान केला. पण यापुढं कुणी काहीही बोललं तर सहन करून घेणार नाही, असा टोला उदयनराजेंनी टीकाकारांना लगावला.     

हेही वाचा- ‘जाणता राजा’ एकच, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा