Coronavirus cases in Maharashtra: 1460Mumbai: 876Pune: 181Kalyan-Dombivali: 32Navi Mumbai: 31Thane: 29Islampur Sangli: 26Ahmednagar: 25Pimpri Chinchwad: 19Nagpur: 19Aurangabad: 17Vasai-Virar: 11Buldhana: 11Akola: 9Latur: 8Other State Citizens: 8Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 6Kolhapur: 5Malegaon: 5Yavatmal: 4Ratnagiri: 4Amaravati: 4Usmanabad: 4Mira Road-Bhaynder: 4Palghar: 3Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Hingoli: 1Jalna: 1Beed: 1Total Deaths: 97Total Discharged: 125BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांसहीत सर्वच नेत्यांनी याबाबत मौन बाळगणं पसंत केलं.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?
SHARE

'मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केली. त्यावर भाजप नेत्यांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांसहीत सर्वच नेत्यांनी याबाबत मौन बाळगणं पसंत केलं.

राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 

राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्टपणे कौल दिला आहे. तरीही सरकार स्थापनेला विलंब होत असल्याने या विलंबाबात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. राज्यातील घटनात्मक पेच आणि त्या अनुषंगाने करता येणाऱ्या कायदेशीर तरतूदींची माहितीही आम्ही घेतली. भाजपकडून सत्तास्थापनेचा कुठलाही दावा करण्यात आलेला नाही. लवकरच आम्ही पुढची रणनिती ठरवू.  

हेही वाचा- शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नाही, संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं

या भेटीवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि भाजपचे संघटन महासचिव व्ही. सतिश देखील  उपस्थित होते. या भेटीनंतर हे सर्व नेते पुन्हा एकदा ‘वर्षा’कडे रवाना झाले. 

राज्यातील या सर्व स्थितीवरुन महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू असल्याचंही म्हटलं जात आहे. हेही वाचा-

मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम, आमदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय

फडणवीस हे शिवसैनिकच, मुनगंटीवार यांचं अजब उत्तरसंबंधित विषय
संबंधित बातम्या