Advertisement

खडसेंनी आता स्वत:चीच समजूत घालावी- चंद्रकांत पाटील

खडसे यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केलं आहे. त्याच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शक म्हणून पक्षाचं काम करावं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp maharashtra president) यांनी एकनाथ खडसे यांना सुनावलं आहे.

खडसेंनी आता स्वत:चीच समजूत घालावी- चंद्रकांत पाटील
SHARES

पक्षाने आतापर्यंत खडसे (eknath khadse) यांना बरंच काही दिलं आहे. पक्षासाठी काम करणं म्हणजे मंत्रिपद, खासदारकी, आमदारकी मिळवणं नाही. खडसे यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केलं आहे. त्याच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शक म्हणून पक्षाचं काम करावं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp maharashtra president) यांनी एकनाथ खडसे यांना सुनावलं आहे.

विधान परिषदेची उमेदवारी (vidhan parishad election) नाकारल्याने नाराज झालेल्या खडसे यांनी पक्षाने विश्वासघात केल्याची, पाठीत खंजीर खुपसल्याची, उपऱ्यांना तिकिटे दिल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

नावांना नकार

यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, खडसे यांनी पक्षासाठी (bjp) अनेक वर्षे काम केले व त्यांच्याबद्दल पक्षात आदरच आहे. मी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु केंद्रीय नेतृत्वाने या सर्वांच्या नावांना नकार दिला. विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे.

हेही वाचा - मला अनेक पक्षांकडून आॅफर- एकनाथ खडसे

स्वत:ची समजूत काढून घ्या

पक्षाने आतापर्यंत खडसे यांना अनेकदा उमेदवारी दिली, विधानसभेसाठी मुलीला उमेदवारी दिली. हरिभाऊ जावळे यांना जाहीर झालेली उमेदवारी बदलून खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या मुलालाही विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या मुलीला जिल्हा बँक, पत्नीला महानंद संस्थांमध्ये पदे मिळाली. त्यावेळी जावळे, गुरुमुख जगवानी यांची खडसे यांनी जशी समजूत काढली होती, तशी समजूत एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काढून घ्यावी. 

वाद करणं योग्य नाही

खडसेंना पक्षाने एवढं सगळं देऊनसुद्धा ते जाहीरपणे पक्षविरोधात बोलत आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली नसावी. पक्षातील वाद चव्हाट्यावर मांडणं योग्य नाही. मुंगी होऊन साखर खाणं चांगलं, असा सल्ला पाटील यांनी खडसेंना दिला.  

काँग्रेस खिळखिळा

दरम्यान काँग्रेस पक्ष देशात आणि राज्यात खिळखिळा झाला आहे. त्यांनी आधी आपले घर सांभाळावं. कोरोना संकट दूर झाल्यावर काँग्रेसला भूकंपाचे हादरे बसतील. देश पातळीवर काँग्रेसमधून दोन तरुण व एक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये येतील. तर महाराष्ट्रात अनेक नेते येतील, अशा शब्दांत खडसे यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली आॅफर देणारे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याची पाटील यांनी खिल्ली उडवली. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा