Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

मला चंपा बोलायचं थांबवलं नाही तर.., चंद्रकांत पाटील संतापले

मला चंपा बोलायचं थांबवलं नाही तर.. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

मला चंपा बोलायचं थांबवलं नाही तर.., चंद्रकांत पाटील संतापले
SHARES

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा अपभ्रंश करून त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या लोकांकडून टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेनंतर या टीकेला जोर आला आहे. त्यामुळे मला चंपा बोलायचं थांबवलं नाही तर.. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

अजित पवार यांनी पंढरपुरातील सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’असा उल्लेख करत त्यांना डिवचलं होतं. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो, असा चिमटा अजित पवार यांनी काढला होता.

त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, मागच्या वेळेस जेव्हा मी इशारा दिला होता, तेव्हा राष्ट्रवादीच्या लोकांना मला चंपा बोलायचं थांबवलं होतं. पण आता जर हे थांबलं नाही, तर त्यांचेसुद्धा शाॅर्टफाॅर्म मला माहीत आहेत. आम्ही तोंड उघडलं, तर अवघड होईल. त्यांच्या मुलांपासून सर्वांचे शाॅर्टफाॅर्म मला करावे लागतील. 'हम किसिको टोकते नही, अगर किसने हमे टोका तो, हम छोडते नही', अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना इशारा दिला. 

हेही वाचा- “कोरोना मृतांच्या नोंदीत ठाकरे सरकारकडून लपवाछपवी”, भाजपचा आरोप

राज्यात कोरोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. अजित पवार यांना सध्या काय झालंय माहीत नाही. पण फारच जोरात सुटलेत आणि त्यांची जीभही घसरत चाललीय, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलीय. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. 

मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर हे उपमुख्यमंत्री, येणार नाही, पण उद्या कम्युनिस्टांचं राज्य आलं, तरी हेच उपमुख्यमंत्री असतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे काही मंत्री सुपात तर काही जात्यात आहेत. कुठल्याही भ्रष्ट मंत्र्याची यातून सुटका नसून ही मालिका अशीच सुरू राहणार आहे. अजित पवार जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं याची जाणीव ठेवा, राज्यात सत्तांतर कसं होईल, कधी होईल हे सर्व तुम्हाला माहीत आहे. मात्र आता जे सत्तांतर होईल ते आमच्या जीवावर होईल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना सूचक इशारा दिला.

(bjp maharashtra president chandrakant patil warns deputy cm and ncp leader ajit pawar on champa remark)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा