Advertisement

'या' अधिकाऱ्यांचं पंचतारांकीत भोजन बंद करा - अनिल गोटे


'या' अधिकाऱ्यांचं पंचतारांकीत भोजन बंद करा - अनिल गोटे
SHARES

मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी दुपारच्या भोजनासाठी घरी अथवा पंचतारांकित हाॅटेल्समध्ये जातात. अशावेळी कामानिमित्ताने मंत्रालयात आलेल्या सर्वसामान्य जनतेला तासनतास ताटकळत बसावं लागतं. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची पंचतारांकीत परंपरा मोडीत काढा, अशी मागणी भाजपाचे आमदार अनिल गोटेयांनी शुक्रवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.


याचा फटका सर्वसामान्यांना

मंत्रालयातील अधिकारी दुपारच्या भोजनासाठी पंचतारांकित हाॅटेल्समध्ये जात असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. याबाबत कामानिमित्त मंत्रालयात आलेल्या सर्वसामान्य जनतेनं विचारणा केली असता ‘साहेब’ मिटिंगला गेले, साहेब विश्रांती घेत आहेत, अशी अनेक कारणं दिली जातात. त्यामुळे त्यांना वाट पाहावी लागते.


ही परंपराच मोडीत काढा

एकीकडे वेळेची बचत व्हावी म्हणून मुख्यमंत्री डबा घेवून येतात. मात्र सनदी अधिकारी जेवणाच्या नावाखाली दोन-दोन तास खर्ची घालतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची परंपरा मोडीत काढण्याची मागणी अनिल गोटे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.


हेही वाचा - 

अनिल गोटेंच्या गोडाऊनमध्ये दडलंय काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा