Advertisement

मुंबई विद्यापीठात ‘सामंतशाही’ सुरू- आशिष शेलार

नॅकचं मूल्यांकन होणार असतानाच राज्य सरकारने मुंबई विद्यापीठात मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केली आहे. यामुळे विद्यापीठाच्या मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई विद्यापीठात ‘सामंतशाही’ सुरू- आशिष शेलार
SHARES

नॅकचं मूल्यांकन होणार असतानाच राज्य सरकारने मुंबई विद्यापीठात मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केली आहे. यामुळे विद्यापीठाच्या मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही, तर राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर घाला घालण्यात येत असून विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांची ‘सामंतशाही’ सुरू असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला.

ठाकरे सरकारवर आरोप करताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई विद्यापीठात (mumbai university) नॅक मूल्यांकनाची तयारी सुरू असतानाच राज्य सरकारने ८ जानेवारी रोजी अचानक मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची परस्पर नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही व कोणतीही अनागोंदी नसतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली. 

हेही वाचा- मुंबईतील शाळा कधी सुरु होणार? महापालिकेने केलं परिपत्रक जारी

कुलगुरूंनी १४ जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक (naac) मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता. तरीही राज्य सरकारने मनमानी करून विद्यापीठावर नवीन कुलगुरू थोपला. त्यामुळे या बदलीचा नॅक मूल्यांकनावर परिणाम झाल्यास त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल. हा प्रकार म्हणजे विद्यापीठांचा सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल असल्याचा आरोपही आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला आहे.

राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून विद्यापीठांची स्वायतत्ता धोक्यात आली आहे. उच्च शिक्षणमंत्र्यांनी पदभार हाती घेताच विद्यापीठांकडून आर्थिक हिशेब मागितले होते. त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर यूजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सिनेट यांना डावलून सरकारने अंतिम वर्ष परीक्षा परस्पर रद्द करण्याचा मनमानी निर्णय घेतला होता. मात्र यूजीसी आणि न्यायालयाने फटकारल्यानंतर परीक्षा घ्याव्या लागल्या.

ठाकरे सरकारचा (thackeray government) हा कारभार विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा, स्वायतत्ता यांना इजा पोहचवणारा आहे. आता आपल्या मर्जीतील कुलसचिवांच्या नियुक्त्या करून विद्यापीठांवर सरकारने ताबा मिळवला आहे. विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या निर्णयाला आम्ही विरोध करतो, याविरोधात आम्ही संघर्ष करू, असा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे.

(bjp mla ashish shelar alleges thackeray government over interference in mumbai university)

हेही वाचा- पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा