Advertisement

मुंबईतील शाळा कधी सुरु होणार? महापालिकेने केलं परिपत्रक जारी

मुंबई आणि परिसरातील शाळा सोमवार १८ जानेवारीपासून सुरु करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शिक्षण विभागानं आयुक्तांकडे पाठवल्याची चर्चा सुरू असतानाच हे पत्रक जारी करण्यात आलं आहे.

मुंबईतील शाळा कधी सुरु होणार? महापालिकेने केलं परिपत्रक जारी
SHARES

एका बाजूला राज्य सरकारने इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असताना, मुंबईतील (mumbai) शाळा तूर्तास तरी बंदच राहणार आहेत. मुंबईतील शाळा नेमक्या कधी सुरू होणार, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करून दिली आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि परिसरातील शाळा सोमवार १८ जानेवारीपासून सुरु करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शिक्षण विभागानं आयुक्तांकडे पाठवल्याची चर्चा सुरू असतानाच हे पत्रक जारी करण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus) गेल्या ९ महिन्यांपासून मुंबईतील बंदच आहेत. शहरातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असल्याचं दिसत असतानाच जगातील काही देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. यामुळे महापालिका प्रशासनाने सावधगिरी बाळगत शहरातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही मुदत संपत असल्याने तसंच २७ येत्या जानेवारीपासून राज्यातील ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मुंबईतील शाळा देखील सुरू होणार का? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला.  

हेही वाचा- ५ वी ते ८ इयत्तेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय! 'या' तारखेपासून सुरू होतील वर्ग


त्यावर खुलासा करताना मुंबई महापालिकेने (bmc) पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात महापालिकेने म्हटलं आहे की, मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये १५ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

तथापी, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाला आला असला, तरीही अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची आलेली दुसरी लाट व अन्य राज्यांतील कोरोनाची (covid19) परिस्थिती पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारी २०२१ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यास मनपा आयुक्तांच्या संदर्भ क्र. ७ नुसारच्या मंजुरी अन्वये खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये विद्यार्थ्यांकरीता १६ जानेवारी २०२१ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. उपरोक्त सूचनेनुसार कार्यवाही करण्यात यावी व त्याचं काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असं नमूद करण्यात आलं आहे.

त्यानुसार मुंबईतील शाळा इतक्यात तरी सुरू होण्याची शक्यता दिसून येत नसल्याचच चित्र आहे. 

(schools in mumbai remain closed from 16th january 2021 as per bmc order)

हेही वाचा- मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा